एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे द्वितीय व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे द्वितीय व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न



पंढरपूर :

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर असलेला भर स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विभागाची ओळख करून देत ई अँड टीसी शाखेचे आधुनिक तंत्रज्ञानातील महत्त्व, तसेच एनईपी–२०२० अंतर्गत प्रोजेक्ट-आधारित शिक्षण, इंटर्नशिप, कौशल्यविकास व एनपीटीईएल अभ्यासक्रमांची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण, कौशल्याभिमुख विषय, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, इंटर्नशिप, बहुविषयक शिक्षण व नवोपक्रम यांना या अभ्यासक्रमात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी एनपीटीईएल अंतर्गत उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांचे महत्त्व त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. गेट परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, गेटच्या माध्यमातून आयआयटी, एनआयटी तसेच डीआरडीओ, आयएसआरओ, बीएसएनएल यांसारख्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षापासूनच नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण तयारी करावी.

हा ओरिएंटेशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंतेच नव्हे तर समाजासाठी सकारात्मक योगदान देणारे जबाबदार नागरिक घडावेत, अशा शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad