*ग्रामपंचायत सदस्य मा.रामदास भाई चवरे यांच्या वाढदिवसानिमित्त पेनूर येथे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिर उत्साहात संपन्न*
👉🏻*शिबिरात 625 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली*
👉🏻 *350 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले* तर
👉🏻 *65 नागरिकांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया*
पेनुरचे ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास भाई चवरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरचे सुप्रसिद्ध शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने पेनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.भाऊसाहेब काका सलगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रकाश कस्तुरे मालक, बाजार समितीचे संचालक सज्जन आबा चवरे, माजी उपसरपंच अशोक लवटे,राजाभाऊ सलगर,अनिल चवरे,सोसायटीचे चेअरमन माणिक अप्पा चवरे, व्हाईस चेअरमन औदुंबर टेकळे,ग्रामपंचायत सदस्य विजय सलगर,भाऊसाहेब धांडे, धोंडीराम निंबाळकर,पोलीस पाटील तुकाराम कारंडे, सिद्धेश्वर अण्णा माने,तानाजी कदम, दगडू पठाण, प्रशांत शिंदे, लखन माने,मधुसुदन ललाटे,चेतन टेकळे, सुधीर मांदे,पवन शेटे, सज्जन माने, संतोष माने आदी जण उपस्थित होत.

