विकास रोखण्यासाठी दहशतीचा डाव; पंढरपूर नगरपालिकेत राजकीय खेळी उघड,

 नगरपालिका बैठकीसाठी प्रभागनिहाय बसण्याची व्यवस्था ठेवणार 


पहिल्याच बैठकीत बसण्यावरून माजवला गेला गोंधळ 


पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ प्रणिता भालके यांचा तोडगा 


विकास कामे रोखण्यासाठीच दहशत माजविण्याचा प्रयत्न 


कायम दहशत ठेवण्यासाठीच स्वीकृत मधून केली निवड 


अरे बोलणाऱ्याला कारे ने उत्तर देण्यास भालके कमी पडणार नाहीत



पंढरपूर/ प्रतिनिधी 


पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिलीच सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली यामध्ये बैठकीच्या कारणावरून गोंधळ उडाला होता. त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी यापुढील प्रत्येक बैठकीत प्रभाग निहाय  बसण्याची व्यवस्था केली जाईल. असा योग्य तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.


   पंढरपूर नगरपालिकेत विकास कामे रोखून धरावी आणि कायम बैठकीमध्ये दहशत निर्माण करावी यासाठी स्वीकृत नगरसेवक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके यांनी केला आहे. यावर घाबरणे हा उपाय नसून भालके हे कोणाला घाबरणारे नसून आरे.ला. कारे.ने उत्तर देणारे आम्ही असल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. 

  नगरपालिका निवडणुकीनंतर पहिलीच सर्वसाधारण सभा असल्यामुळे , नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार आयोजित केला होता. हा सत्कार परिचारक गटाकडून स्वीकारला जाणार नाही असा इशारा स्वीकृत नगरसेवक लक्ष्मण शिरसाट यांनी यावेळी दिला होता. त्यामुळे हा सन्मान आमच्या पदरी पडू दिला नसल्याची खंतही काही परिचारक गटाच्या नगरसेवकांनी माझ्याशी बोलून दाखवली असल्याचा गौफ्यस्पोट नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी सांगितला आहे. त्यामुळे विकासाच्या आड येणाऱ्या त्या दहशत करणाऱ्या नगरसेवकाची यापुढील काळात मोठी पंचायत होणार आहे.

   नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पंढरपूरकरांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी ज्या नगरसेवकांना निवडून दिले होते. त्यांच्या हातून त्या प्रभागाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून विकास करणे गरजेचे आहे. मात्र कोणाच्यातरी दहशतीमुळे हा विकास थांबवला जात असेल तर पंढरपूरची जनता नक्की विचार करेल असेही भालके यांनी सांगितले आहे. 

  


*हा घ्या पेनड्राईव मधील पुरावा*


नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ती परिस्थिती कुणामुळे झाली आणि का झाली याचा आम्ही खुलासा करण्यापेक्षा हा घ्या पुरावा म्हणत जवळ असलेल्या पेन ड्राईव्ह पत्रकारांना दिला. यावरून या पुढील काळात विकासासाठी कोण नेमके आडवे येणार आहे याचेही आपणच पहा असेही सांगितल्याने दहशत माजवणाऱ्या त्या नगरसेवकाची पंचायत होऊन बसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad