एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सात दिवसीय व्हॅल्यू अˈडिश्‌न्‌ कार्यक्रमाचे आयोजन

 एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सात दिवसीय व्हॅल्यू अˈडिश्‌न्‌ कार्यक्रमाचे आयोजन



पंढरपूर | प्रतिनिधी :

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवसीय इन-हाऊस व्हॅल्यू अडिशन कार्यक्रमाचे आयोजन दि.०१/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. “ॲडव्हान्सड प्रॉब्लेम सॉल्व्हींग अँड लॉजिक बिल्डींग फॉर इंडस्ट्री रेडीनेस” या विषयावर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

“ॲडव्हान्सड प्रॉब्लेम सॉल्व्हींग अँड लॉजिक बिल्डींग फॉर इंडस्ट्री रेडीनेस” या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता, तर्कशक्ती व विश्लेषणात्मक विचारसरणी अधिक सक्षम करणे हा आहे. या अंतर्गत लॉजिकल थिंकिंग, अल्गोरिदमिक विचारप्रक्रिया तसेच कोडिंग लॉजिक यांवर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील उदाहरणे व केस स्टडीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान दिले जात असून, त्यामुळे प्लेसमेंट प्रक्रिया, टेक्निकल इंटरव्हयू व प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी विद्यार्थी अधिक आत्मविश्वासपूर्ण व सक्षम बनत आहेत. हा उपक्रम संगणक विभागप्रमुख डॉ. सुभाष व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, डॉ. व्ही. जी. जगताप हे प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून, अशा कौशल्यवर्धक उपक्रमांमुळे विद्यार्थी उद्योगासाठी सज्ज होतील, असे त्यांनी नमूद केले.

या सात दिवसीय व्हॅल्यू अॅडिशन कार्यक्रमाला द्वितीय वर्ष संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad