*कृषी दुतांकडुन आधुनिक फवारणी तंत्राचे व संरक्षण किट विषयी प्रशिक्षण*
रत्नाई कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात शेतकऱ्यांसाठी आज शेतात स्प्रे सोल्युशन तयार करण्याचे व फवारणी कशी करावी यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभीत कृषि दूतांनी फवारणीसाठी आवश्यक साधने, रसायनाचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण आणि मिश्रणाची योग्य पद्धत याबाबत माहिती दिली. यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोल्युशन तयार करण्याचे पाऊल-पाऊल मार्गदर्शन करण्यात आले. शेतात प्रत्यक्ष फवारणी करतांना, योग्य अंतर, प्रमाण आणि सुरक्षेचे नियम पाळण्याचे महत्व कृषी दूतांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष फवारणी करून अनुभव घेतला व त्यांच्या शंकांचे निरसन केले गेले. या प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. योग्य सोल्यूशन तयार करून शेतात वेळोवेळी फवारणी केल्यास पिकांचे आरोग्य सुधारते, रोग व कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते, असे यांनी नमू द केले व तसेच यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत स्वप्निल नाईकनवरे, प्रज्योत शिरढोणे, रोहित मगर, विवेक घुले, शेखर टापरे, श्रीराम फडतरे, प्रथमेश दुरगुडे, शिवराज निंबाळकर, गुरुदत्त भोसले यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर आणि विषयतज्ञ प्रा. डी. पी. बरखडे यांचे मार्गदर्शन लाभले.

