घरकुलाची कामे प्राधान्याने पुर्ण करून सोलापूर जिल्हा राज्यात अग्रणी ठेवा
सोलापूर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्या जिल्हयातील ग्रामपंचायतीचा राज्यात पहिल्या क्रमांक मिळवणे हे अंतिम ध्येय असून यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतील या अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रभागी ठेवा. यासाठी जिल्ह्यातील घरकुलांची कामे प्राधान्याने पुर्ण करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी केले.
जिल्ह्यात दोन टप्यात एक लाखापेक्षा अधिक घरकुल मंजूर झाली आहेत. अतिवृष्टी, महापूर व इतर अनेक कारणांनी घरकुलची कामे प्रलंबित आहेत. शिवाय दिवाळी सणामुळेही घरकुल बांधकाम बंद होते. लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्त्याचेही वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जलद गतीने बांधकाम पूर्ण करावे. आता सर्व अधिकारी व लाभार्थ्यांनी घरकुलची कामे पूर्ण करून राज्यात जिल्ह्याला अग्रणी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अतिरिक्त सीईओ कोहीणकर यांनी केले.

