पाटकूल व मगरवाडी रोड जोड रस्त्याच्या उद्घाटन व कामाला सुरुवात मा. श्री. चरणराज चवरे यांच्या नियोजन समिती फंडातून निधी परिसरातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या सुटणार.

 पाटकूल व मगरवाडी रोड जोड रस्त्याच्या उद्घाटन व कामाला सुरुवात 


मा. श्री. चरणराज चवरे यांच्या नियोजन समिती फंडातून निधी


परिसरातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या सुटणार.


 पाटकूल-मगरवाडी जोड रस्त्याच्या कामाचा 'शिवसेने'चे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हस्ते श्रीगणेशा



 गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाटकूल रोड व मगरवाडी रोडला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा आज अधिकृतपणे शुभारंभ झाला आहे. हा रस्ता म्हणजे केवळ दोन रस्त्यांना जोडणारा पूल नाही, तर या भागातील नागरिकांच्या सुविधेचा आणि विकासाचा नवा अध्याय आहे. मळ्यातील या जोड रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून परिसरातील नागरिकांची मागणी होती. ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान लाभले, ते म्हणजे शिवसेनेचे झुंजार जिल्हाप्रमुख आणि नियोजन समितीचे सदस्य मा. श्री. चरणराज चवरे 

मा. चरणराज चवरे साहेब यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या (फंडातून) या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला आहे आणि आज त्यांच्याच शुभहस्ते या रस्त्याचे उद्घाटन आणि कामाची सुरुवात होत आहे

मा. चरणराज चवरे साहेब यांच्या हस्ते पाटकूल रोड व मगरवाडी रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. या रस्त्यामुळे आता मळ्यातील नागरिकांसह सर्वांची सोय होणार आहे


"शिवसेनेचे कार्य म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणे. हा रस्ता मंजूर करून आज काम सुरू करताना मला विशेष आनंद होत आहे. या परिसराचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे आणि यापुढेही विकासाच्या कामांसाठी माझा निधी नेहमी उपलब्ध राहील,अत्यंत कमी कालावधीत, निधी मंजूर करून त्वरित कामाला सुरुवात केल्याबद्दल मा. श्री. चरणराज चवरे साहेब यांचे येथील सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानले. तसेच, या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक यांचेही आभार हा रस्ता लवकरच पूर्ण होऊन या भागातील दळणवळणाची समस्या दूर होईल, अशी आशा व्यक्त करतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad