मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक रंगतदार; सौ.सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप यांनी महिला सर्वसाधारण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार...
मंगळवेढा (प्रतिनिधी) – आगामी 2025 सालच्या नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असताना मंगलवेढा शहराच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. शहरातील सक्रीय सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप यांनी महिला सर्वसाधारण नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार असून, मतदारांना त्यांनी आवाहन केले आहे.
महिलांच्या उन्नतीसाठी दीर्घकाळ कार्यरत
सौ. सुजाता जगताप यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी श्रीराम फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण व शहरी भागात आरोग्य जनजागृती मोहीम, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
जगताप कुटुंबाची राजकीय व सामाजिक परंपरा
त्यांच्या उमेदवारीला अर्ज दाखल करणार असल्याचे कळताच शहरात नवनवीन चर्चा रंगल्या आहेत. कारण त्यांच्या मागे एक भक्कम सामाजिक इतिहास आहे. सुजाता जगताप यांच्या सासऱ्यांनी – श्री. रामचंद्र एकनाथ जगताप अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक आणि विकासाभिमुख काम केले आहे.त्याचबरोबर यांचें पती अजित रामचंद्र जगताप यांनीदेखील नगरपरिषद क्षेत्रात दीर्घ काळ सक्रिय रहात विविध समस्यांवर समाजाभिमुख भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व घटकांना जोडून ठेवत विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आह
शहराच्या प्रगतीसाठी नवा दृष्टीकोन" – सुजाता जगताप
पुढे बोलताना सुजाता जगताप म्हणतात,
“मंगळवेढा शहराच्या भविष्यातील विकासासाठी नागरिकांचे प्रश्न जाणून घेणे, शहरातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणे आणि महिला सुरक्षेला प्राथमिकता देणे हे माझे मुख्य ध्येय आहे.”त्यांनी पुढे असेही नमूद केले की, शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी तयार करणे हे आपले प्राधान्यक्रम असतील.
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सुजाता जगताप यांनी शहरातील सर्व मतदार बांधवांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
“मी सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आपण सर्वांनी आशिर्वाद देऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहावे,”असे त्या म्हणाल्या.
शहरात वाढत्या चर्चांना वेग
यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला उमेदवारीमुळे राजकीय समीकरणात काही नवे आयाम समोर येतील, अशी चर्चा शहरात सुरू आहे.



