कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग तर्फे सीपीआर जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न.*

 *कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग तर्फे सीपीआर जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न.*




 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पंढरपूर तर्फे हृदय पुनर्ज्जीवन म्हणजेच सीपीआर जनजागृती उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी तात्काळ करावयाच्या मदतीचे प्रत्यक्षिक नागरिकांना समजावून सांगितले. या उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी श्री विठ्ठल मंदिर परिसर तसेच ग्रामपंचायत शेळवे या ठिकाणी प्रात्यक्षिकामधून जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांना सीपीआर देण्याची योग्य पद्धत दाखवण्यात आली. प्रत्येक नागरिकाला हृदयविकाराच्या झटक्यावेळी करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. या उपक्रमामुळे हृदयविकाराम मुळे होणारी जीवितहानीची संख्या कमी होईल व अनेक नागरिकांचे जीव वाचतील असे मत कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग चे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

  श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन जाधव उपस्थित होते तसेच सर्व विभागाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad