एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे ॲडव्हान्सेस इन लेझर रिमोट सेंसिंग ऑफ फॉरेस्ट इकोसिस्टीम’ या विषयावर कार्यशाळा*

 *एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे ॲडव्हान्सेस इन लेझर रिमोट सेंसिंग ऑफ फॉरेस्ट इकोसिस्टीम’ या विषयावर कार्यशाळा*



पंढरपूर (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ॲडव्हान्सेस इन लेझर रिमोट सेंसिंग ऑफ फॉरेस्ट इकोसिस्टीम या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

महाविद्यालय हे आयआयआरएस-इसरो चे नोडल सेंटर असून, या केंद्राच्या माध्यमातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत वन परिसंस्थेतील संसाधन व्यवस्थापन, जैवविविधता आणि हवामान बदल अभ्यासात लेझर रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान, लेझर रिमोट सेन्सिंग आणि पर्यावरणीय डेटा संकलनातील नव्या प्रगत तंत्रज्ञानाची ओळख झाली. द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरणीय नकाशांकन आणि डेटा विश्लेषणाविषयी थेट अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि पर्यावरणीय संवर्धनाविषयी वैज्ञानिक दृष्टी विकसित होण्यास या उपक्रमाने हातभार लावला, असे सहभागी विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, नोडल सेंटर प्रमुख मिलिंद तोंडसे तसेच विभागातील सर्व प्राध्यापकवृंद यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad