सीना नदीच्या पूरग्रस्त बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणाला 'सह्याद्री दूर्ग प्रतिष्ठान'चा आधार*


*सीना नदीच्या पूरग्रस्त बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणाला 'सह्याद्री दूर्ग प्रतिष्ठान'चा आधार*



सोलापूर - गेल्या काही आठवड्यांत सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे शेकडो शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. घरं, जनावरे, शेतजमिनी आणि त्यावर उभं असलेलं पिकं सर्वकाही पाण्यात गेलं.या आपत्तीने बळीराजाच्या भविष्याचे म्हणजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र त्यांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू नये म्हणून सह्याद्री दूर्ग प्रतिष्ठानच्या वतीने तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील 210 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे वाटप करण्यात आले आहे.


सह्याद्री दूर्ग प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून एक अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावामधील जिल्हा परिषद शाळेत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना बॅग्ज, वह्या, पुस्तके आणि इतर आवश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष श्री अशीष पताळे पाटील, श्री अविनाश देविदास पोफळे जिल्हा प्रशासक, श्री शेखर चाळसी श्री अलंकार पताळे पाटील श्री ऋषी शिंदे श्री योगेश पाटील यांच्याहस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.


सह्याद्री प्रतिष्ठानने आज या आपत्तीच्या काळात शैक्षणिक साहित्याचे वाटप करत विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी नव्याने उमेद जागवली आहे. दु:खात सुद्धा उमेद कशी शोधायची, हे या उपक्रमातून शिकायला मिळाले असल्याची भावना व्यक्त करत सह्याद्री दूर्ग प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष श्री. गोविंद सुरवसे यांनी दूर्ग सेवकांचे आभार मानले. 


यावेळी प्रसंगी संतोष तेलंगी, श्री लिंबाजी आदटराव श्री औदुंबर शहाजी पताळे श्री सागर लक्ष्मण पताळे श्री काकासाहेब तुकाराम पताळे श्री जयवंत कुलकर्णी आदी दुर्ग सेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad