एस. के. एन. सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे व्हर्च्युअल कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या संपन्न*

 *एस. के. एन. सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे व्हर्च्युअल कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या संपन्न*




पंढरपूर (प्रतिनिधी) :

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात दिनांक १२ व १३ सप्टेंबर २०२५ रोजी व्हर्च्युअल कॅम्पस ड्राइव्ह हा दोन दिवसीय उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कॅम्पस ड्राइव्हसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आय वर्क टेक्नॉलॉजीज, पुणे येथील सिनियर ऑटोमेशन इंजिनिअर श्री. अनिल कस्तुरे हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अप्टिट्यूड टेस्ट आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गटचर्चा व एच.आर. मुलाखती घेण्यात आल्या. या सर्व फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची संवाद कौशल्य, विश्लेषण क्षमता, आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व यांची कसून चाचणी घेण्यात आली.

या उपक्रमात १०१ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य सिद्ध केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. यामध्ये काही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम रिझ्युम (Best Resume), उत्कृष्ट लिसनर (Best Listener), टीम लीडर (Team Leader), पर्सनॅलिटी (Best Personality) विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन आणि राबवणीत प्रा. अविनाश हराळे, प्रा. स्वप्नील टाकळे यांनी समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावली. त्यांना राजेश्वरी अंगडी, अमित पांढरे, जश्विना पांढरे, विशांत बागेवाडीकर, निलोफर शेख, दीक्षा शेळके, पायल ताठे, साहिल गोडसे या विद्यार्थ्यांनी संयोजनात मोलाची मदत केली.

सदर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु. सानिका बाबर हिने केले.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी तसेच संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

व्हर्च्युअल स्वरूपात पार पडलेल्या या कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक निवड प्रक्रियेचा अनुभव मिळाला असून, त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शक ठरले. आगामी काळात अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad