*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील कु. गिंताजली देशमुख या विद्यार्थिनीची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) मध्ये इंटर्नशिपसाठी निवड*
पंढरपूर : एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्ष बी.टेक. ची विद्यार्थिनी कु. गितांजली जगन्नाथ देशमुख यांची भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), संरक्षण मंत्रालयांतर्गत सशुल्क सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
कु. गितांजली नवी दिल्ली येथील “सेंटर फॉर फायर, एक्सप्लोसिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी” (CFEES), DRDO येथे कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि तांत्रिक/व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत राहणार आहे. या इंटर्नशिपमध्ये तिला मानधन मिळणार असून, तिला प्रगत संरक्षण तंत्रज्ञान, रॅपिड प्रोटोटायपिंग, सुरक्षा प्रोटोकॉल्स आणि संशोधन-विकास प्रकल्पांवर काम करण्याचा अमूल्य अनुभव मिळणार आहे.
ही निवड कु. गितांजलीच्या परिश्रम, तांत्रिक कौशल्य व सातत्यपूर्ण समर्पणाचे द्योतक असून, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या उद्योगाभिमुख आणि संशोधनाधारित मार्गदर्शनाचेही फलित आहे.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग व संपूर्ण सिंहगड परिवारामार्फत कु. गितांजली देशमुख हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या या यशाबददल व समृद्ध आणि प्रेरणादायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

