पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये स्पर्धा परिक्षेमार्फत उपलब्ध संधी या विषयावर व्याख्यान आयोजित स्पर्धा परीक्षेमध्ये संयम आणि सातत्य गरजेचे – मयूर राजमाने यांचे प्रतिपादन*

 *पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये स्पर्धा परिक्षेमार्फत उपलब्ध संधी या विषयावर व्याख्यान आयोजित

स्पर्धा परीक्षेमध्ये संयम आणि सातत्य गरजेचे – मयूर राजमाने यांचे प्रतिपादन*




पंढरपूर (प्रतिनिधी): सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे ‘स्पर्धा परीक्षा मार्फत उपलब्ध संधी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. पृथ्वी अकॅडमी, कराडचे संचालक मा. मयूर राजमाने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते मयूर राजमाने यांचे स्वागत करून करण्यात आले. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी स्पर्धा परीक्षा सेलमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

व्याख्यानात मयूर राजमाने यांनी राज्यसेवा, लोकसेवा आयोग व सरळ सेवा अंतर्गत मिळू शकणाऱ्या संधींबाबत सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना संयम आणि सातत्याची महत्त्व पटवून दिले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील मागे पडण्याचे कारण काय आहे, यावरही त्यांनी मार्मिक भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील 590 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. स्पर्धा परीक्षा सेलच्या माध्यमातून दर शनिवार व रविवार इच्छुक विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण दिवस मार्गदर्शन सत्र व अभ्यास वर्ग घेतले जातात.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा परीक्षा सेल प्रमुख प्रा. अभिजीत सवासे, डॉ. अतुल आराध्ये, प्रा. अजित करांडे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. उदयकुमार फुले, प्रा. सिद्धेश पवार, प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका बाबर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad