फॅबटेक कॉलेजच्या ४९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनीत निवड* □ फॅबटेक मध्ये करिअरच्या अनेक संधी: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती

 *फॅबटेक कॉलेजच्या ४९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनीत निवड*


□ फॅबटेक मध्ये करिअरच्या अनेक संधी: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती 



सांगोला: प्रतिनिधी 


सांगोला फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक मध्ये शिक्षण घेत असतानाच ४९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेड कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.

     बजाज ऑटो लिमिटेड हि भारतातील दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची उत्पादन करणारी अग्रेसर कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९४० च्या दशकात झाली असून जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर भारतातील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे. अशा कंपनीत फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ३१ आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली आहे.

     सांगोला फॅबटेक काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये बजाज ऑटो लिमिटेड कंपनीचे अधिकारी चनगोंडा कोरे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांकडे असलेले कौशल्य, ज्ञान आणि बौद्धिक क्षमता आदींची चाचणी घेऊन ४९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

    बजाज ऑटो लिमिटेड कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य तानाजी बुरूंगले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad