फॅबटेक मधील सौरभ ढोण अटलांटा युनायटेड मध्ये अभियंता म्हणून कार्यरत* □ वार्षिक ८५ लाख पॅकेज: डॉ. अमित रूपनर यांची माहिती

 *फॅबटेक मधील सौरभ ढोण अटलांटा युनायटेड मध्ये अभियंता म्हणून कार्यरत*


□ वार्षिक ८५ लाख पॅकेज: डॉ. अमित रूपनर यांची माहिती 



सांगोला: प्रतिनिधी  


फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर (एम. एस.) शिक्षण हे टेक्सास ए ॲण्ड एम. युनिव्हर्सिटी मध्ये एम एस करून अभियंता म्हणून कार्यरत असून वार्षिक ८५ लाख एवढा पगार घेत असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.

   फॅबटेक इंजिनिअरिंग काॅलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेचा डंका परदेशात होत असुन काॅलेज मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर (एम. एस.) शिक्षण अमेरिकेत घेऊन सौरभ ढोण हे अभियंता म्हणून अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांना वार्षिक ८५ लाख इतका पगार आहे.

  सौरभ ढोण हा विद्यार्थी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थी आहेत. फॅबटेक काॅलेज मध्ये अभियांञिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (एम. एस) शिक्षणासाठी परदेशातील युनिव्हर्सिटीत शिक्षणाची संधी भेटत असल्याने पालक वर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

   फॅबटेक काॅलेज मधील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊन शासकीय सेवेत तसेच नामांकित कंपनीत नोकरी मिळत असल्याने त्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.