*पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक तांबोळी यांचा पंढरीत सत्कार*
पंढरपूर (प्रतिनिधी) पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती पत्रकारांच्या वाहनांना टोल मधून सूट राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या पत्रकारांची स्वतंत्र निवृत्त अधिकाऱ्यामार्फत चौकशी या सह राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यव
हार करीत आहे पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदी अश्फाक तांबोळी यांची नुकतीच निवड करण्यात आली होती त्यांचा पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र ओळखपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे पंढरपूर शहराध्यक्ष लखन साळुंखे नूतन तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले नागेश काळे चैतन्य उत्पात बाहुबली जैन रफिक आत्तार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रामकृष्ण बिडकर संतोष चंदनशिवे रविंद्र शेवडे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

