भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा... पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; भगीरथ भालकेंवर नाराज होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा..

 भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा...


पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; भगीरथ भालकेंवर नाराज होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा..



पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँगेस कडून भगीरथ भालके रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. काँग्रेसआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन, आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबरला विठ्ठल इन कार्यालय, स्टेशन रोड, पंढरपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी आणि पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले. 


माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ आहे. काल जयंत पाटील यांनी देखील अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे, हा प्रश्न नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढून ही जागा निश्चितपणे जिंकणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.