पंढरपूर सिंहगड मध्ये "ऑनलाईन फसवणूक पासून सावध कसे राहायचे" याविषयावर कार्यशाळा*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "ऑनलाईन फसवणूक पासून सावध कसे राहायचे" याविषयावर कार्यशाळा*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी अर्थ निर्मिती कंपनीचे सदस्य प्रशांत औटी यांचे "ऑनलाईन फसवणूक पासून सावध कसे राहायचे" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रशांत औटी यांचे डाॅ. समीर कटेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यादरम्यान बोलताना प्रशांत औटी म्हणाले,अलीकडील काळामध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हातोहाती मोबाईल आल्यामुळे अनेकजण डिजिटल पेमेंटला प्राधान्य देताना दिसतात. मात्र हीच संधी साधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चोरटेदेखील आता ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक करत आहेत. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी पावले उचलत आहे. फसवणूक होऊ नये यासाठी तसेच फसवणूक झाल्यास पुढे काय करावे यासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आर्थिक फसवणूक झाल्यास गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी या सूचनांचे पालन करायला हवे. यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असुन ऑनलाईन आर्थिक फसवणुकी पासुन सावध राहणे काळाची गरज असल्याचे प्रशांत औटी यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

 ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डाॅ. समीर कटेकर, प्रा. अंजली चांदणे, राजाराम राऊत आदींसह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.