*पंढरपूर सिंहगड मध्ये "एस ए पी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी"एस ए पी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट" या विषयावर तुषार कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस तुषार कुलकर्णी यांचे प्रा. अनिल जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तुषार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील वेगवेगळ्या उपलब्ध संधी आणि त्यांच्यासाठी लागणारे कौशल्य कसे आत्मसात करावे याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. धनंजय गिराम, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अनिल जाधव, प्रा. समाधान माळी, प्रा. अभिषेक गोडसे आदींसह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले.