आयआयटी, मुंबई येथील परिसंवादात स्वेरीच्या २३ विद्यार्थ्यांचा सहभाग
पंढरपूर- राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या व विशेषतः तंत्रशिक्षणात लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर (ता.पंढरपूर) च्या एकूण २३ विद्यार्थ्यांनी आयआयटी, मुंबई येथील परिसंवादात नुकताच सहभाग घेतला. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना स्वेरीच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीत देखील सातत्य दिसून येत आहे. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आयआयटी, मुंबई येथे झालेल्या ‘आकार’ या परिसंवाद सत्रामध्ये स्वेरीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले संशोधनपर लेख सादर केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ.एम.जी. देशमुख व प्रा.सी.आर. लिमकर यांच्या सहकार्याने सिव्हील इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या हर्षदा सुनील गेळवे, श्वेता हणमंत जाधव, मानसी महादेव सलगर, साक्षी सुजीत उबाळे, शुभांगी चंद्रकांत उंबरजे, वैष्णवी धर्मराज जाधव, आकांक्षा ज्ञानेश्वर भाकरे, मानसी कांतीलाल कराळे, स्मिता नागेश पंडीत, प्राजक्ता विजय निमकर, तेजश्री सोमनाथ थिटे, प्राची मनोज मोरे, शारदा मोहन डुबल, अक्षता ज्ञानेश्वर पाटील, रवि अनिल मस्तूद, रोहीत शहाजी बिचुकले, अनसार पिरसो सुतार, महांतेश शिवानंद दिवटे, संकेत दत्तात्रय शिंदे, श्रुती संजय मंगेडकर या २० विद्यार्थ्यांनी पेपर प्रेझेन्टेशन मध्ये तर साक्षी महादेव कोरके, चैत्राली मिलिंद कुलकर्णी व प्रणाली रमेश जाहीर या तीन विद्यार्थिनींनी पोस्टर प्रेझेन्टेशन मध्ये असे मिळून एकूण २३ विद्यार्थ्यांनी या परिसंवादात सहभाग घेऊन पेपर व पोस्टर यांचे उत्तमरीत्या सादरीकरण केले. आयआयटी, मुंबई मध्ये दि. १६ मार्च २०२३ रोजी झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्थापत्य अभियांत्रिकी आधारित परिसंवादाचे (इंटरनॅशनल सिव्हील इंजिनिअरिंग सिम्पोझियम) १६ वे सत्र असलेल्या ‘आकार’ या बुकलेटसाठी विद्यार्थ्यांनी आपले रिसर्च पेपर्स सादर केले. आयआयटी मुंबई येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे येथील संशोधनास आणखी गती मिळणार आहे. गेल्या वर्षी देखील स्वेरीच्या १७ विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभागी होऊन सादरीकरण केले होते. एकूणच अशा संशोधनपर परिषदांमुळे तांत्रिक संशोधन करण्याकडे स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. परिषदेमध्ये सहभाग घेतल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.