स्वेरीत ड्रोन तंत्रज्ञानाला ऊर्जा मिळत आहे. -विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई स्वेरीत ‘वर्किंग ऑफ ड्रोन्स अँड ड्रोन टेक्नॉलॉजी’ या कार्यशाळेचे उदघाटन


स्वेरीत ड्रोन तंत्रज्ञानाला ऊर्जा मिळत आहे. -विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई


स्वेरीत ‘वर्किंग ऑफ ड्रोन्स अँड ड्रोन टेक्नॉलॉजी’ या कार्यशाळेचे उदघाटन



पंढरपूर- ‘ड्रोन चा कृषी क्षेत्रामध्ये विशेषतः शेतीच्या फवारणी, पाहणी व आदी शेती संबंधित प्रत्येक कार्यात सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा कृषी क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातही वापर वाढणार आहे. अलीकडच्या काळात संशोधन क्षेत्रात भरारी मारत असताना स्वेरी मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाला ऊर्जा मिळत आहे.’ असे प्रतिपादन बेंगलुरू येथील जनरल अॅरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई यांनी केले.



        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने ‘वर्किंग ऑफ ड्रोन्स अँड ड्रोन टेक्नॉलॉजी’ या विषयावर दि.०६ फेब्रुवारी ते दि.११ फेब्रुवारी २०२४ अशा तब्बल आठवडाभर चालत असलेल्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई हे मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविकामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ यांनी ‘ड्रोन टेक्नॉलॉजी’चे सध्याचे महत्त्व व ड्रोनपासून ते ड्रोन तंत्रज्ञानावर होत असलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमरजित केने यांनी ‘महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशन (आर.जी.एस.टी.सी.) कडून ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित बहु-संस्थात्मक संशोधन प्रस्तावास सुमारे रु.३४ कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजुर करण्यात आला असून या संशोधन प्रस्तावात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट, मुंबई व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या तीन संस्थांचा समावेश असून या निधीवरच हे ड्रोन संशोधन प्रकल्प साकार होत आहेत.’ असे सांगून त्यांनी आठवडाभर आयोजिलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे एस. थिरूमलाई यांनी पुढे ‘ड्रोन तयार करण्यासाठी लागणारा कालावधी, एकूण खर्च, याची क्रिया नेमकी कशी चालते, वजन क्षमता, ड्रोनची वजन मर्यादा, होणारा उपयोग, ड्रोन कसे उडवायचे?, मल्टी रोटर, फिक्सिंग हायब्रीड' यासंबंधीची माहिती दिली. पुढे त्यांनी 'व्हिडिओ व फोटोग्राफी मध्ये केला जाणारा ड्रोन चा वापर, ड्रोन चे नॅनो, मायक्रो, लहान, मध्यम व मोठे असे प्रकार, त्यांचे वजन व विविध आकार' याबाबत खुलासा केला. त्यानंतर 'प्रत्येक ड्रोनची टेक्नॉलॉजी एकच असली तरी याचे स्वतंत्रपणे प्रशिक्षण घ्यावे लागते. ड्रोनचा वेग व दिशा यावर रोटर च्या साह्याने नियंत्रण करता येते. ड्रोनचे विविध भाग त्याचे कार्य, स्पीड कंट्रोलर, ब्रश कंट्रोलचे कार्य, त्यावर असणाऱ्या बॅटरीची क्षमता, ड्रोनवर असणारे पाते (ब्लेड) त्याची क्षमता ट्रान्समीटर, रिसिव्हर, फ्लाईट कंट्रोल' आदी बाबत माहिती दिली. 'आपण नियोजित केलेल्या ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरा दरम्यान रेंजद्वारे ड्रोनचे कार्य चालते तर आकाशात ३० मीटर उंचीपर्यंत ड्रोनवर जाऊ शकते.’ असे सांगून विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई यांनी ड्रोन विषयी अधिक सविस्तर माहिती दिली.



 यावेळी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य मैदानावर या ड्रोनचे विविध प्रकारे प्रात्यक्षिक दाखवले गेले. यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर.गिड्डे, डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. मोहन ठाकरे आदी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन वरील संशोधन कार्य सुरू असून यात शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार प्रा. रविकिरण जाधव, उत्तम यलमार, भाग्यश्री देशमुख, प्राजक्ता सूर्यवंशी, सागर कदम व इतर सहकारी या ड्रोन प्रकल्पासाठी परिश्रम घेत आहेत. प्रा. नितीन कौटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad