*पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थीनी साठी आरोग्य तपासणी शिबिर*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर महाविद्यालया अंतर्गत असलेला सावित्रीबाई गर्ल्स फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महिलांचे आरोग्य हा महिला सबलीकरणाचा एक महत्वाचा पैलू आहे. विद्यार्थिनी व महाविद्यालयातील महिला कर्मचारी यांच्या मध्ये महिला आरोग्य महत्वाचा विषय आहे. यासाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे मत सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरमच्या चेअरमन प्रा. अंजली पिसे यांनी या दरम्यान बोलताना मत व्यक्त केले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिसा तांबोळी, डाॅ. पुजा पवार, डॉ. शितल फराटे, डाॅ. नलिनी वाघ, डाॅ. अमोल जाधव, आरोग्य साहाय्यक फिरोज शेख, आरोग्य सेवक बबन कसबे, आरोग्य सेविका कान्होपाञा माळी, लॅब टेक्निशियन अरविंद बागल, सुरज सकटे यांच्या सह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हेल्थ चेकअप, रक्त तपासणी, एक्सरे आदीसह अनेक तपासणी केल्या.
यादरम्यान आरोग्य अधिकारी डाॅ. तांबोळी यांनी विद्यार्थिनीच्या आरोग्यविषयक महत्वपूर्ण मार्गदर्शन करून मोलाचा सल्ला दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. निशा करांडे, प्रा. ऋतुजा साबळे, संध्याराणी शिंदे, संध्या शिंदे, वंदना माळी, तृप्ती कदम, संजाली भानवसे, अनिता पुजारी आदींसह महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.