सांगोला तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसु लागल्या आहेत..प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात -- डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌*

 *सांगोला तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसु लागल्या आहेत..प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात -- डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌*




   सध्या सांगोला तालुक्यातील बहुतांश भागात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची अडचण प्रकर्षाने जाणवु लागली आहे..

सांगोला तालुक्यात पाऊसाचे प्रमाण कमी आसने हे नित्याचेच आहे.निसर्गाच्या आशा लहरीपणामुळे शेतकरी सतत अडचणीत येताना दिसत आहे.सांगोला शहरासहीत तालुक्यातील वेगवेगळ्या भागात आज पाणीटंचाई जाणवु लागली आहे.

 कोळा भागातत शेतीच्या पाण्याची जे तलाव आहेत त्या मध्ये बुध्देहाळ,यमाई  व तलावात आजही पाणी सोडले गेले नाही‌.. लाभधारक शेतकऱ्यांनी रितसर पैसे भरले असताना व मागणी केलेली असताना सुद्धा या तलावात पाणी सोडले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

 तसेच  घेरडी भागातील परिस्थिती या हुन आणखीन बिकट आहे पिण्याचे पाणी पाच -पाच दिवस नागरिकांना मिळत नाही.. शेतीच्या पाण्याचे तर सोडाच बहुतांश पिके हातातुन गेली आहेत..आणखी आठ-दहा दिवस गेले तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुध्दा फार मोठया प्रमाणात निर्माण होणार आहे.

अशीच परिस्थिती जवळा भागात सुध्दा आहे जवळा भागात सुध्दा आठवड्यातुन तीन ते चार दिवसाआड पिण्याचे पाणी येत आहे.. शेतीच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची इथेही बिकट परिस्थिती आहे.



  महुद भागातही काही वेगळे चित्र नाही.. लक्ष्मीनगर, ईटकी ,कटफळ आशा भागात पिण्याच्या पाण्यासाठीची वन वन सुरुच आहे लक्ष्मीनगर मधील महीलांनी तर पाण्यासाठी टाहो फोडुन आपल्या व्यथा मांडल्या आहेत..व कटफळ येथील राजेवाडी तलाव भरून घेण्याची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांची पिके पुर्णतः नाहीसी झाली आहेत.तसेच निरा उजवा कालव्याचे पाणी वेळेवर व पुर्ण क्षमतेने येत नाही.त्यामुळे  हे पाणी शेवटच्या शेतकऱ्या़च्या शेतात जात नाही.. त्या मुळे हे   पाणी वेळेवर व पुरेशा क्षमतेने यावे या मागणीसाठी लाभधारक  शेतकरी  उपोषणासारखे मार्ग अवलंबत आहेत,आंदोलने करीत आहेत.

तसेच नाझरा एखतपुर या भागात सुध्दा पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.बेलवण नदीला पाणी सोडले  नसल्याने सदर भागातील पिके नाहीशी झाली आहेत तसेच पाणी पुरवठा विहरी सुध्दा पाण्याविना कोरड्या पडलेल्या आहेत सदर भागातील बोर ला सुध्दा पाणी नाही ही परिस्थिती विचारात घेता येणारा काळ फारच कठीण असेल हे मात्र नक्की.


अशी परिस्थिती तालुक्यातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात सुरु झाली आहे.. सध्या फेब्रुवारी महिना  असुन .. मार्च, एप्रिल,मे,या  तीन महिन्यांत पिण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.तसेच  जनावरांच्या चाऱ्याची सुध्दा समस्या भेडसावणार आसुन या गोष्टीचा सारासार विचार करून प्रशासनाने ताबडतोब यावरती उपाय योजना कराव्यात..कारण आपल्याकडे जुन महिन्यात  वेळेवर पाऊस पडेलच असे नाही समजा पाऊस वेळेवर पडलाच तरी चारा लगेच निर्माण होईल असे ही नाही.आशा गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सामांन्य  नागरीकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलली पाहिजेत असे मत डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad