एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात मशीन लर्निंग इनॅबल्ड नेक्स्ट जनरेशन फायरवॉल या विषयावर तज्ञ व्याख्यान उत्साहात संपन्न*

 *एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात मशीन लर्निंग इनॅबल्ड नेक्स्ट जनरेशन फायरवॉल या विषयावर तज्ञ व्याख्यान उत्साहात संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागामध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मशीन लर्निंग इनॅबल्ड नेक्स्ट जनरेशन फायरवॉल या विषयावर गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर २०२३ रोजी तज्ञ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या व्याख्यानास द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशी माहिती माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून श्री नितीन कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री नितीन कुलकर्णी हे रेड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कार्यरत आहेत ते इंडस्ट्रियल ट्रेनर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. 

 या कार्यशाळेत त्यांनी मशीन लर्निंग इनॅबल्ड नेक्स्ट जनरेशन फायरवॉल या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागामधून द्वितीय वर्षातील 60 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

  या व्याख्यानाचे आयोजन प्रा. धनश्री भोसले यांनी केले. हे व्याख्यान यशस्वी 

करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष पिंगळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad