मौजे शिरनांदणी येथील कोतवाल कर्मचारीयांचेवर कारवाई करण्यासाठी मनसेचे मंगळवेढा तहसीलदार यांना निवेदन...
मा. तहसिलदार सो.,
मंगळवेढा तहसिल कार्यालय,
विषय :- मौजे शिरनांदगी येथील कोतवाल कर्मचारी
यांचेवर कारवाई करणेबाबत..
शिरनांदगी ता. मंगळवेढा येथे सौ. लक्ष्मी भगवान लाड हया कोतवाल पदावर काम करीत असूनसुध्दा सतत गैरहजर असतात. त्या कधीही कार्यालयात येत नाहीत व स्वच्छताही करीत नाहीत. परंतू त्यांना मोबाईलवरुन बोलविण्यात आले किंवा काही विचारले तरी भाषा सरळ नसते. प्रत्येकाला दम देणे, दाब देणे, गुन्हा दाखल करणे अशा भाषा वापरत असते. लेडीज असल्यामुळे कोणीही तक्रार करीत नाहीत. अशा कोतवालास बडतर्फ करण्यात यावे व संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण कोतवालाची माहिती आपणास कळवित राहीन तेंव्हा कृपा करुन आपण शिरनांदगी गावाकडे लक्ष दयावे ही