पंढरपूर सिंहगडच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.

    या मेळाव्याची सुरुवात पालक प्रतिनिधी शंकर पवार, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. नामदेव सावंत आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

   या मेळाव्यात पालक प्रतिनिधी शंकर पवार यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

   यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.

   पालक प्रतिनिधी शंकर पवार बोलताना म्हणाले, पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज हे गुणवत्तेत उत्कृष्ट आहे. महाविद्यालयातील सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी सिंहगड कॉलेज मध्ये उपलब्ध होत असल्याचे मत पवार यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

    या मेळाव्यात अनेक पालकांनी सिंहगड कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. या मेळाव्यात प्रा. नामदेव सावंत यांनी विभागाचा शैक्षणिक आढावा सादर केला. यादरम्यान कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.   

  हा मेळावा यशस्वी 

करण्यासाठी पालक मेळावा प्रतिनिधी प्रा. उदयकुमार फुले, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित इंगोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. उदयकुमार फुले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad