स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न 'अभियंता दिना' निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न


'अभियंता दिना' निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम 



पंढरपूर- गोपाळपुर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अभियंता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पदवी अभियांत्रिकीच्या जवळपास २०० विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले.

        कोणताही शैक्षणिक कार्यक्रम असो अथवा सामाजिक, स्वेरी विविध विधायक उपक्रमात नेहमीच हिरीरीने सहभाग घेत असते. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गंत ‘अभियंता दिना' च्या निमित्ताने या ऐच्छीक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय चौधरी, प्रा. रविकांत साठे व डॉ. एम. एम. आवताडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जेष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.नारायण दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेशकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या वतीने जिल्हा समन्वयक शशिकांत डोंगरे, सुधीर भातलवंडे, कबीर काळेल, प्रयोगशाळेचे किशोर कवडे, सौरभ वेळापुरे व सहाय्यक कर्मचारी यांच्या सहकार्याने रक्त तपासणी, हिमोग्लोबिन सीबीसी,थायरॉईड प्रोफाईल, कॅल्शीअम, बीएसएल आर (शुगर), एएमएच (इन्फर्रटीलिटी), प्रोलॅक्टीन, पांढऱ्या पेशीचे प्रमाण, सीए-१२५ (क्षयरोग) व रक्तगट अशा विविध तपासण्या मोफत स्वरुपात करण्यात आल्या. विद्यार्थिनी व प्राध्यापिका असे मिळून एकूण ७२ जणांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला. चेअरमन डॉ.संजयकुमार शिंदे व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय ब्लड सेंटर, सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या दोन रक्तपेढयांना पाचारण करण्यात आले होते. दोनही रक्तपेढ्यामध्ये मिळून अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण विद्यार्थिनी, विद्यार्थी व प्राध्यापक असे मिळून जवळपास २०० जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी संबंधित रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad