नवीन उद्योग सुरू करताना धाडस महत्वाचे- सुहास आदमाने पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये "इंजिनिअर्स डे" कार्यक्रम उत्साहात संपन्न

 नवीन उद्योग सुरू करताना धाडस महत्वाचे- सुहास आदमाने


पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये "इंजिनिअर्स डे" कार्यक्रम उत्साहात संपन्न




पंढरपूर: प्रतिनिधी


सध्या प्रत्येक क्षेत्रात खुप स्पर्धा निर्माण झाल्या आहेत.  उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे असते. उद्योगात, व्यवसायात प्रेझेंटेशन तसेच वेळेला खुप महत्त्व असते. य मध्ये योग्य नियोजन करून वाटचाल केल्यास यश निश्चित भाटते. याशिवाय व्यवसायात मोठ्या लोकांच्या ओळखी होतात. व्यवसायातील वाईट प्रसंग आहेत. व्यवसायात खुप वाईट अनुभव येतात पण त्यातुन नवीन शिकायला मिळते. हे नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणता प्रोजेक्ट तयार करत असताना मार्केटिंग खुप महत्वाचे असते. ग्राहकांना वेगळे प्रोजेक्ट देणे आवश्यक असते. नवनवीन बदल यामधून अनेक रोग सद्या पसरत आहेत. यासाठी तरुणांकडे जे आहे ते करा, फक्त नोकरी म्हणत बस नका, जे आवडते ते करा असे मत स्पेन्का मिनरल वॉटर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्ट सुहास अदमाने यांनी सिंहगड मध्ये मुलाखतीमध्ये विचारल्या प्रश्नांवर उत्तर देताना म्हटले आहे.

   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी इंजिनीअर्स डे निमित्त तरूण उद्योजक सुहास अदमाने यांनी उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे उपक्रमशील प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी मुलाखती घेतली होती.

    या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात करिअरच्या संधी कशा असतात अथवा त्या कशा मिळवाव्यात याबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या मुलाखतीतून उपस्थित विद्यार्थ्यांना लाभले. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये इंजिनीअर्स डे निमित्त सुहास अदमाने, इंजि. कांतीलाल डुबल, इंजि. शरदचंद्र कुलकर्णी, इंजि. उदय उत्पात आदीसह पंढरपूर मधील अभियंत्याचा पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुहास अदमाने यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad