जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ संपन्न; प्रधानमंत्री कौशल्य मॅरेथॉन स्पर्धा ही उत्साहात पार.

 जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ संपन्न; प्रधानमंत्री कौशल्य मॅरेथॉन स्पर्धा ही उत्साहात पार.



जव्हार-जितेंद्र मोरघा


शिल्पकारांचे दैवत भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ रविवारी पार पडला. तसेच भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रधानमंत्री कौशल्य दौड म्हणजेच पीएम स्किल रन ही आयोजित करण्यात आली होती. 

दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाडा येथील खोसला कंपनीचे मॅनेजर रामगोपाल कुशवाह, जव्हार गोखले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.हेमंत मुकणे, सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेची माजी विद्यार्थी ॲड.पारस संजय सहाणे, खोसला कंपनीच्या धनश्री चोरमागे , लोढा फाउंडेशनचे केशव पावरा, पत्रकार मनोज कामडी उपस्थित होते.

सकाळ सत्रात प्रधानमंत्री कौशल्य दौडचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी तसेच इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकांचा यावेळी प्रमाणपत्र व रोख रक्कम तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी यांत्रिक मोटार गाडी ,वायरमन, फिटर ,वेल्डर, डिझेल मेकॅनिक या व्यावसायिक वर्गात प्रथम तीन मध्ये उच्च गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत सोहळा पार पडला.

तसेच इतर उपक्रमांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट निर्देशक व प्राचार्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे हेमंत मुकणे यांनी बोलताना सांगितले की आयटीआय मधून उत्तीर्ण होऊन चांगली नोकरी लागली तर आपल्या आई-वडिलांना विसरू नका त्यांचा सांभाळ करा असा सल्ला दिला.

राम गोपाल कुशवाह  यांनी मार्गदर्शन केले की खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी कशी मिळवावी तसेच मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातील याची मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे ॲड.पारस सहाणे यांनी सांगितले की मी पण जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. आयटीआय म्हणजे नोकरी हमखास हे ब्रीदवाक्य लागू होते रोजगार मिळतोच . विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे सोडू नये. नोकरी लागली तरी उच्च शिक्षणाची कास धरावी. उच्च शिक्षण घेतल्याने माणूस  प्रगल्भ होतो, समाजासाठी व देशासाठी सामाजिक कार्यासाठी नेहमी तत्पर राहावे असा सल्ला ही त्यांनी दिला.

जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्याम अंबाळकर आणि इतर गट निर्देशक हे नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उत्तेजन देत असतात तसेच समाजात प्रतिष्ठित असणाऱ्या पाहुण्यांना बोलावून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन होईल असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला, की झटपट नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच नव उद्योजक निर्मितीला चालना मिळते. त्यामुळे मुली आयटीआय मधील व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना अधिकाधिक पसंती देत असल्याचे दिसून येते.आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळतेच. त्यामुळे मुलांसह मुली सुद्धा आता या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक गट निर्देशक मांजे,  सूत्रसंचालन गट निर्देशक दिनेश पडवळ व रुपाली ताटे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिर्देशक शशी सोनार यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्याम अंबाळकर व इतर शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad