पंढरपूर सिंहगडच्या सुयश गुरजे ची "अलटेन" कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 पंढरपूर सिंहगडच्या सुयश गुरजे ची "अलटेन" कंपनीत  कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड




पंढरपूर: प्रतिनिधी



अलटेन हि एक बहुराष्ट्रीय नामांकित मेकॅनिकल कंपनी असुन हि कंपनी सल्लागार कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९८८ साली झाली आहे. अलटेन या कंपनीचे विविध देशांमध्ये ३० कार्यालय आहेत. हि कंपनी औद्योगिक, दुरसंचार आणि सेवा क्षेञातील तांत्रिक आणि माहिती प्रणाली विभागांसाठी डिझाईन आणि संशोधन प्रकल्प प्रदान करते. याशिवाय माहिती प्रणाली विभागांसाठी आय टी प्रणाली विकसित करते. हि कंपनी दुरसंचार, संगणक प्रणाली, मल्टिमीडिया, संरक्षण, विमानचालन आणि माहिती प्रणाली यासारख्या उद्योगांमध्ये सेवा प्रदान करते. अशा या कंपनी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेला कु. सुयश निलकंठ गुजरे याची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आह. अलटेन कंपनी निवड झालेल्या सुयश निलकंठ गुरजे यांना कंपनीत वार्षिक ३.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.


  एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असतानाच कुमार सुयश गुजरे यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.