पंढरपूर सिंहगड मधील कुमारी प्रिया चांडोले हिची ३ कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगड मधील कुमारी प्रिया चांडोले हिची ३ कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड*



पंढरपूर: प्रतिनिधी 


 विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात असुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होते. चालू शैक्षणिक वर्षांतील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील कुमारी प्रिया दिगंबर चांडोले ची कॅपजेमिनी, वोडाफोन व एचसीएल टेक्नॉलॉजीज या ३ कंपनी कॅम्पस प्लेसमेंट मधुन विद्यार्थिनींची निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

   एचसीएल टेक्नॉलॉजीज व कॅपजेमिनी (वार्षिक पॅकेज ४.२५ लाख रूपये) ह्या दोन कंपन्या एक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपन्या आहेत, ज्याचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. आणि वोडाफोन (वार्षिक पॅकेज ५ लाख रूपये)

हि एक बहुराष्ट्रीय दुरसंचार कंपनी आहे. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय तसेच जागतिक मुख्यालय न्युबरी, बर्कशायर, इंग्लंड या देशात आहे. या कंपनीची सेवा प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशनियामध्ये सेवा देणारी कंपनी आहे.याशिवाय मोबाईल नेटवर्क नागरिकांना उपलब्ध करून देणारी वोडाफोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. 

  तीन कंपनीत प्लेसमेंट झालेल्या कुमारी प्रिया दिगंबर चांडोले ह्या वोडाफोन कंपनी जाॅईन करणार असून विविध कंपनीत निवड झाल्याबद्दल प्रिया चांडोले यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.