लोहयात माऊली नगर येथे श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ सप्ताहास मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ

 लोहयात माऊली नगर येथे श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ सप्ताहास  मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ

----------------------------------------

* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा शहरातील माऊली नगर येथे दि. ६ फेब्रुवारी २०२३ पासून श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ सप्ताहास मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाले आहे.

 सदरील श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ सप्ताहा निमित्त संपूर्ण आठवडा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  यात भागवताचार्य  अनंत महाराज बेलगावकर यांच्या समधुर रसाळ भागवत कथा संपन्न होत आहे कथेची वेळ दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत आहे.

तसेच या श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ सप्ताहा निमित्त संहिता वाचक श्री हभप दिलीप महाराज कुलकर्णी करीत असुन संगीत साथ  गायक श्री हभप कालीदास महाराज कुलकर्णी  देत आहेत तसेच दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारी गुरुवर्य श्री हभप लक्ष्मीकांत प्रभू महाराज लोहेकर यांचे सांयकाळी ७ ते ९ दरम्यान हरि किर्तन होईल तसेच दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोज‌ रविवारी कार्यक्रमाची सांगता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.आज लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन काही शन भागवत कथेचे श्रवण केले 

 तेव्हा सदरील कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गोविंद मारोती कवठेकर, गोपाळ मारोती कवठेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad