*पंढरपूर सिंहगड मध्ये "क्लाउड कंप्युटिंग" या विषयावर मार्गदर्शन संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर मधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात "क्लाउड कंप्युटिंग" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे मार्गदर्शन शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या दरम्यान एन्कोरा इंकचे टीम लीडर तज्ञ दिनेश झेंडे यांचे डाॅ. सुभाष पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर रेझोमेक्स कंपनीचे नॉलेज बेस कन्सल्टंट रुपेश रणवरे यांचे प्रा. नामदेव सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्लाऊड कॉम्प्युटिंग हे मोबाइल आणि कॉम्प्युटरचं जीवन आहे, असं विधान आजकाल आपल्याला सहज ऐकायला मिळत. तसा क्लाऊड कॉम्प्युटिंगचा गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये बऱ्यापैकी प्रसार झाला आहे. परंतु अजूनही बऱ्याच लोकांना क्लाऊड म्हणजे काय, याची फारशी माहिती नसते. उंच पर्वतांवर ढगांमध्ये तुमचा लॅपटॉप घेऊन बसणे म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग का? किंवा मग रॉकेट किंवा विमानात बसून कॉम्प्युटिंग करणे म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग का? आपण क्लाऊड कीबोर्डवर प्रत्यक्षात टाइप करू शकतो का? याचा आपल्याला काही उपयोग होऊ शकतो का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे, म्हणूनच जाणून घेऊ या आपल्याला क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा कशा प्रकारे वापरता येऊ शकते? कोणती सुविधा वापरावयाची? क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय?
क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे आपल्या गरजेची माहिती दूरच्या कोणत्या तरी कॉम्प्युटरवर साठवणे जी माहिती आपल्याला कधीही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून सहजरीत्या मिळवता येऊ शकते. क्लाऊड म्हणजे तो दूरवरचा कॉम्प्युटर आणि त्या कॉम्प्युटरशी म्हणजेच क्लाऊडशी कनेक्ट होण्यासाठी बऱ्याचदा फक्त इंटरनेट असले की पुरेसे ठरते.
याचे साधे-सोपे उदाहरण म्हणजे जी-मेल, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स यावर आपण आपली माहिती टाकून जतन करून ठेवू शकतो.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना क्लाउड कंप्युटिंगच्या ताज्या ट्रेंड्स आणि त्याच्या भविष्यातील संभावनांबद्दल चांगली माहिती मिळाली.
विद्यार्थ्यांसाठी हे. व्याख्यान खूपच उपयुक्त ठरेल. या व्याख्यानाचे आयोजन कॉम्पुटरसायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाने केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सोमनाथ झांबरे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा होनमाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. सुभाष पिंगळे यांनी मानले.