*पंढरपंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची बांधकामास भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बांधकामास भेट दिली.
कोर्टीयेथील कराड रोड येथे चालू असलेल्या लाईफ लाईन नर्सिंग कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामास भेट देण्यात आली.
या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना इमारतीचे बांधकाम कसे करावे याचे नियोजन तसेच बांधकामाच्या ठिकाणी घेतली जाणारी सुरक्षा व नियोजन या संदर्भात माहिती देण्यात आली.
ही भेट स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षातील कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड प्रॅक्टिसेस या विषयासंदर्भात होती. सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार ही भेट नियोजित करण्यात आली होती. ही भेट यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. गणेश लकडे, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. निखत खान या सोबत विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.