स्वेरीमध्ये ‘आरोग्य तपासणी शिबिर’ संपन्न ‘रासेयो’ व ‘माजी विद्यार्थी संघटने’चा स्तुत्य उपक्रम


स्वेरीमध्ये ‘आरोग्य तपासणी शिबिर’ संपन्न 


‘रासेयो’ व ‘माजी विद्यार्थी संघटने’चा स्तुत्य उपक्रम 



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभाग व महाविद्यालयाच्या ‘माजी विद्यार्थी संघटने’च्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या निमित्ताने स्वेरीतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘आरोग्य तपासणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

        संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सोलापूरच्या वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा.डॉ चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूरच्या वतीने हे शिबिर आयोजित केले होते. रुग्णालयाचे प्रतिनिधी सुधीर भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हे शिबीर घेण्यात आले. या तपासणीमध्ये लिपिड प्रोफाइल, एलएफटी केएफटी, शुगर, सीबीसी, एचबी, एसी, कॅल्शियम, युरिक अॅसिड, प्रोटीन्स, आर ए, थायरॉईड चाचणी, आरोग्य तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. प्रत्येक व्यक्तीच्या पाच टेस्ट करण्यात आल्या. या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ महाविद्यालयातील जवळपास ७५ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला. या उपक्रमामुळे सहभागी व्यक्तींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास व प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांची जाणीव वाढण्यास मोलाची मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रा. अविनाश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्राध्यापकवर्ग तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले, सचिव डॉ. सुरज रोंगे¸ माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी दत्तात्रय घोडके, विद्यार्थिनी मृणालिनी सावंत व प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad