पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये माजी विद्यार्थ्याचा “औद्योगिक क्षेत्रातील PLC ऑटोमेशन, नौकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन*

 पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये माजी विद्यार्थ्याचा “औद्योगिक क्षेत्रातील PLC ऑटोमेशन, नौकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन




पंढरपूर - एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात "Enhancing Applications of PLC in Industries" या विषयावर माजी विद्यार्थी श्री. अक्षय नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी दिली.

या व्याख्यानाचा उद्देश शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यामधील दरी कमी करणे हा होता. विद्यार्थ्यांना औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि त्याच्या एकत्रीकरणाच्या पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली.

या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि औद्योगिक प्रवृत्ती, आवश्यक तांत्रिक कौशल्ये, तसेच ऑटोमेशन व कंट्रोल अभियांत्रिकीतील करिअर संधींबाबत मोलाचे ज्ञान मिळवले.

महाविदयालयामार्फत विदयार्थ्यांना विद्याशाखेतील विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना औद्योगिक अनुभव आणि करिअर मार्गदर्शन केले जाते. सदरील कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad