IIT कॉम्प्यूटर्सच्या विद्यार्थिनीला जिल्ह्यात प्रथम क्रमांक — ‘सांगा टक्के बक्षीस पक्के’ या योजनेत ऋतुजा साळुंखे यांचा गौरव

 IIT कॉम्प्यूटर्सच्या विद्यार्थिनीला जिल्ह्यात प्रथम क्रमांक — ‘सांगा टक्के बक्षीस पक्के’ या योजनेत ऋतुजा साळुंखे यांचा गौरव



पंढरपूर – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) यांच्या राज्यस्तरीय राबविण्यात आलेल्या ‘सांगा टक्के बक्षीस पक्के’ या उपक्रमात IIT कॉम्प्यूटर्स, पंढरपूर येथील विद्यार्थिनी कु. ऋतुजा धनाजी साळुंखे (रा. मुंढेवाडी) हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.


या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा ₹2000/- (दोन हजार रुपये) चा धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यावेळी पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे, IIT कॉम्प्यूटर्सचे संचालक नितीन आसबे सर, दत्ता कळकुंबे सर, रोहिणी मांजरे मॅडम, वैष्णवी पाटील मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कु. ऋतुजा हिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, तिचे IIT कॉम्प्यूटर्स संस्थेतील मार्गदर्शक व शिक्षकांचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.